अजब, चक्क झाडाच्या खोडातून वाहू लागले पाणी

गुरूवार, 29 डिसेंबर 2022 (08:54 IST)
नाशिकमध्ये चक्क झाडाच्या खोडातून पाणी  वाहू लागले आहे. ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात  असलेल्या वणी  नाशिक रोडवरील ओझरखेडयेथे घडला आहे. गुलमोहराच्या झाडातून अक्षरशः पाण्याचा झरा वाहू लागला आहे.
 
लखमापुर फाट्यापासून हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडाच्या खोडातून पाणी अखंड पाणी वाहत आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने मोठी वर्दळ या ठिकाणी असते. त्यामुळे येणारे-जाणारे नागरिक थांबून हा सर्व प्रकार पाहत असून आपल्या मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत आहे. तर या गोष्टीला धार्मिक तर्क देखील लावले जात आहे. अनेक लोक बाटलीत हे पाणी भरून पाहत आहे, काही जण पाण्याला हात लावून पाहत आहे.
 
नागरिक याबाबत तर्कवितर्क लावत असतांना या गुलमोहराच्या खालून काही वर्षांपूर्वी पाण्याची पाईपलाइन गेली होती. त्यानंतर त्याच्यावरती झाड लावण्यात आले. हे झाड सुकलेले होते. त्यानंतर पाण्याची पाईपलाईन झाडामध्ये  शिरली असावी त्यामुळे थेट प्रवाह हा झाडाच्या खोडातून बाहेर पडत असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती