दराडे हे बारामती तालुका पोलिस दलात कार्यरत होते. इंदापूर तालुक्यातील अकोले येथे ते राहत होते. मागील दोन-तीन दिवसांपासून त्यांना खोकला येत होता. नेहमीप्रमाणे ते आपली ड्युटी बजावून घरी आराम करत होते. रात्रीच्या सुमारास त्यांनी खोकल्याचे औषध समजून तणनाशक विषारी औषध प्राशन केले. यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. घरच्यांना त्यांनी मी हे औषध प्यायले असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.