औरंगाबादमध्ये लॅाकडाऊन मागे घेतला, रात्रीची संचारबंदी कायम

बुधवार, 31 मार्च 2021 (08:03 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबादमध्ये लॅाकडाऊन करण्यात आला होता. परंतु आता हा लॅाकडाऊन मागे घेण्यात आला आहे. या मध्ये दररोज दुकाने संध्याकाळी 8 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. परंतु रात्रीची संचारबंदी ही कायम ठेवली आहेत.
 
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून दुकान उघडण्यासाठी ही संमती देण्यात आली आहे. औरंगाबादेत वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र हा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आला आहे.  मात्र काही दिवसात परिस्थिती अधिक बिकट आणि नियंत्रणाबाहेर जात आहे, असं दिसलं तर औरंगाबादमध्ये कधीही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती