वाचा, लॉकडाऊनबाबत टोपे काय म्हणाले

मंगळवार, 30 मार्च 2021 (16:30 IST)
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे तसेच विरोधकांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संबंधी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊन करण्यावाचून पर्याय नाही. सर्वांच्या मताने हा निर्णय घेण्यात येईल.
 
राज्यात ज्या प्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्या प्रमाणे आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. रुग्ण वाढत राहिल्यास आपल्याकडे असलेली संसाधने, गोळ्या, औषधे या सर्वाचे मोजमाप करत असतो. वाढत असणारी रुग्णसंख्या पुढच्या आठवड्यात किती असेल तर त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील या सगळ्याचे अभ्यास करणे गरजेचे आहे. या सर्वावर पर्याय म्हणजे लॉकडाऊन हा कोणालाही मान्य नसतो लॉकडाऊन कोणालाच प्रिय नाही. परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाऊन करत नसतो. हा अभ्यास करण्याचा विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली आहे.
 
लॉकडाऊनचा निर्णय विचार करुण घेतला जातो. जसे निर्बंध कडक करायचे तसे करत जायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपस्थित केला आहे. परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. ऐनवेळी लॉकडाऊन बाबत तात्काळ निर्णय घेण्यात येत नाही. त्यामुळे पहिले निर्बंध कडक करत जावं लागत आहे. असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाला लोकांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. अनेक नागरिका बिनधास्त फिरत आहेत. राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांचे पालन झाले पाहिजे. लग्न सोहळ्यांना गर्दी करु नका, विनाकारण गर्दी करु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
 
कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची काळजी नसते परंतु त्यांना होम क्वारटाईन केले जाते. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या बऱ्याच रुग्णांचे घर छोटे असते त्यामुळे त्यांच्यासह सर्व कूटूंब कोरोनाबाधित होते. अशा रुग्णांवर लक्ष ठेवले जात नाही. जास्त अजारी वाटल्यास असे रुग्ण रुग्णालयात पोहचतात. त्यांनंतर त्यांची परिस्थिती बिघडते. त्यामुळे आरोग्या विभागाला आवाहन केले आहे की, ज्या रुग्णांचे घर छोटे आहे अशा रुग्णांना सरकारी सीसीसी रुग्णालयात आणले पाहिजे. होम आयसोलेशनध्ये ठेवून का असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती