पाकिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानमधील लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
शनिवारी आणि रविवारी पाकिस्तानला 4.0 रिश्टर स्केलच्या मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. पाकिस्तान हा भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय देश असल्याने येथे भूकंप होण्याची शक्यता जास्त आहे