अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खासगी रुग्णालयाच्यापेक्षा शासकीय रुग्णालयात खर्च कमी लागत असल्यामुळे लोक शासकीय रुग्णालयात वळत आहेत. तसेच डॉक्टरांनी गंभीर रुग्णांना देखील या रुग्णालयात पाठवणी करत असल्याने स्थिती गंभीर झाली आहे.
तथापि, रुग्णालयाचे उच्च अधिकारी सांगतात की, एका बेडवर दोन रुग्ण असलेल्या स्थितीला नियंत्रणात आणले आहेत. असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अविनाश गावंडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ' सध्या रुग्णालयात कामाचा ताण जास्त आहे.आम्ही बेडची संख्या वाढवत आहोत .आता स्थिती नियंत्रणात असून एका बेड वर आता एकच रुग्ण आहे' नागपूर शहरात सोमवारी 3100 नवीन कोरोनाच्या प्रकरणांची नोंद केली गेली आणि 55 लोक कोरोनामुळे मृत्युमुखी झाले. शहरात आता पर्यंत कोरोनाचे 2,21,997 प्रकरणे आढळले आहेत.