अलीकडील काळात देशात कोरोनाविषाणूंच्या नवीन घटनांमध्ये मोठी झेप झाली आहे.यामुळे, नवीन निर्बंधांचा कालावधी देखील सुरू झाला आहे. विमानतळावर मास्क लावणे ,सामाजिक अंतर राखणे सारखे अनेक प्रोटोकॉल चेही अनुसरण केले जात आहे. या दरम्यान डीजीसीए ने एक निवेदन जारी केले असून या मुळे हवाई प्रवाश्यांना मोठा धक्का बसू शकतो.
“स्पॉट फाईनसह कोरोना प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचेही पर्याय आहेत.गेल्या आठवड्यात डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की गेल्या आठवड्यात तीन एयरलाईन्समध्ये 15 प्रवासी कोरोनाच्या नियमांना मोडताना आढळले होते. त्याच्या वर तीन आठवडे उड्डाण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.