राज्यात 31,643 नवे रुग्ण, 20,854 जणांना डिस्चार्ज

मंगळवार, 30 मार्च 2021 (08:22 IST)
राज्यात सोमवारी तब्बल 31 हजार 643 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच, 20 हजार 854 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27 लाख 45 हजार 518 एवढी झाली असून, त्यापैकी 23 लाख 53 हजार 307 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 टक्के एवढं झाले आहे.राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 3 लाख 36 हजार 584 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात 102 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 54 हजार 283 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे.सध्या राज्यात 16 लाख 7 हजार 415 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 16 हजार 614 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 94 लाख 95 हजार 189 नमूने तपासण्यात आले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती