होळी शुभेच्छा संदेश | Holi Messages in Marathi
 
	
		
			 
										    		रविवार,  28 मार्च 2021 (09:50 IST)
	    		     
	 
 
				
											रंग प्रेमाचा
	रंग स्नेहाचा
	रंग नात्यांचा
	रंग बंधाचा
	रंग हर्षाचा
	रंग उल्हासाचा
	रंग नव्या उत्सवाचा
	होळीच्या हार्दिक शुभेच्छा
	***********
	रंगात रंगुनी जाऊ
	सुखात चिंब न्हाऊ
	जीवनात राहुदे रंग,
	सौख्याचे – अक्षय तरंग!
	रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
	***********
	लाल रंग तुमच्यासाठी गालांसाठी
	काळा रंग तुमच्या केसांसाठी
	निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी
	पिवळा रंग तुमच्या हातांसाठी
	गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी
	पांढरा रंग तुमच्या मनासाठी
	हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी
	होळीच्या या सार रंगांसोबत
	तुमचे जीवन रंगून जावो...
	हार्दिक शुभेच्छा
	***********
	रंगपंचमीचा सण रंगांचा
	आगळ्या-वेगळ्या ढंगाचा
	वर्षाव करी आनंदाचा.
	रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा.
	***********
	होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
	निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
	अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
	होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
	***********
	भिजू दे रंग अन् अंग स्वछंद
	अखंड उठु दे मनी रंग तरंग...
	व्हावे अवघे जीवन दंग
	असे उधळूया आज हे रंग...
	***********
	रंग न जाणती जात नी भाषा
	उधळण करुया चढू दे प्रेमाची नशा...
	मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
	भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे...
	होळीच्या शुभेच्छा...
	***********
	रंगून जाऊ रंगात आता,
	अखंड उठु दे मनी तरंग,
	तोडून सारे बंध सारे,
	असे उधळुया आज हे रंग…
	***********
	रंगबिरंगी रंगाचा सण हा आला
	होळी पेटता उठल्या ज्वाला
	दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
	सण आनंदे साजरा केला.
	***********
	आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
	सुखाच्या रंगांनी आयुष्य रंगबिरंगी होवो!
	रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
