राज्यात ४०,४१४ नवीन रुग्णांचे निदान

सोमवार, 29 मार्च 2021 (09:20 IST)
रविवारी राज्यात ४०,४१४  नवीन रुग्णांचे निदान झाले. तर १०८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
राज्यात १७,८७४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आतापर्यंत एकूण २३,३२,४५३  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.९५% एवढे झाले आहे. सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ३,२५,९०१  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारी राज्यात ४०,४१४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २७,१३,८७५  झाली आहे.
 
रविवारी नोंद झालेल्या एकूण १०८ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २० मृत्यू अकोला-५, पुणे-३, सोलापूर-३, ठाणे-३, वाशिम-२, नंदुरबार-१, कोल्हापूर-१, जालना-१ आणि नागपूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती