आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 लाख 38 हजार 154 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 17 हजार 303 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 4 हजार 936 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
दिवसभरात राज्यात 48 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 52 हजार 041 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.43 टक्के एवढा आहे तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.35 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 3 लाख 18 हजार 707 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 688 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
पुण्यात सध्या सर्वाधिक 12 हजार 577 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल नागपूर मध्ये 9 हजार 141 सक्रिय रुग्ण आहेत. अमरावती 6 हजार 740, मुंबईत 7 हजार 899, ठाण्यात 7 हजार 276 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.