नवीन धोरणानुसार, प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) अनुदान दिले जाईल. काही इलेक्ट्रिक वाहनांनाही टोलमधून सूट दिली जाईल, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवल्यानंतर फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने नवीन ईव्ही धोरण मंजूर केले आहे ज्याअंतर्गत प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान दिले जाईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती आणि वापरात वाढ झाली पाहिजे. नवीन धोरणांतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधा देखील मजबूत केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत, मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना आणि बसेसना टोलमधून पूर्णपणे सूट देण्यात येईल.