मिळालेल्या माहितीनुसार एका मोठ्या कारवाईत, मुंबई गुन्हे शाखा युनिट २ ने चीनमधून येणाऱ्या ई-सिगारेट तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अंदाजे ३२ लाख रुपयांच्या ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या आहे आणि एका प्रमुख संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख रवींद्र किशोर देडिया अशी झाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे.
	 
	पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेले ई-सिगारेट हे डिजिटल उपकरण आहे ज्यांची क्षमता प्रति उपकरण २००-२५० पफ आहे. भारतात त्यांची किंमत प्रति युनिट अंदाजे २००० रुपये आहे, तर चीनमध्ये ते फक्त ५०० रुपयांना उपलब्ध आहे. या तफावतीचा फायदा घेत, देडिया मोठ्या नफ्यासाठी भारतात ही खेप तस्करी करण्याचा कट रचत होता.
	 
	गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देडियाने ही खेप समुद्रमार्गे भारतात आणण्याची योजना आखली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तस्करीमागील नेटवर्क आणि पुरवठा साखळीची चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे भारतात किती मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ई-सिगारेट येऊ शकतात हे स्पष्ट होते.