आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असं ते यावेळी म्हणाले.लातूरमध्ये आयोजित कीर्तनात ते यांसदर्भात बोलत होते.इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातही या कोरोनाचा दाखला देण्यात आला. एका भाविकास उद्देशून ते म्हणाले, की कीर्तनात
उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हा आपला जन्म नसून पूनर्जन्म आहे.कधीतरी वारकऱ्याची सेवा केली, तुळशीला पाणी घातलं, काळ्या आईची
सेवा, कधीतरी कीर्तनकाराच्या पाया पडलो, हे पुण्य आपल्याला 2021साली कामाला आलं. आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवानं काढलाय, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. काही लोक खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत.
त्यामुळे आनंदानं, हसत हसत जगा, असा सल्ला त्यांनी दिला. इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाची लिंक खाली देत आहोत. सोळाव्या मिनिटांपासून कोरोना महामारीवर त्यांनी भाष्य केलं.