आजपासून राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच आरोग्य कर्मचारी, कोविड काळात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे. आज सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत जे.जे. रुग्णालयात या प्रतिबंधात्मक मात्रा देण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, लसीकरण प्रमुख डॉ.ललित संखे यांच्यासह डॉक्टर आणि जे.जे. रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिबंधात्मक मात्रा दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कर्मचारी याबरोबरच 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.