'त्या' फोटोवर राष्ट्रवादीनं दिलं स्पष्टीकरण...

शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:42 IST)
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पण, शहा आणि फडणवीस यांच्या भेटीच्या फोटो मॉर्फ करून शरद पवार सुद्धा बैठकीला हजर असल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला.
राष्ट्रवादीने यावर आक्षेप घेत हा फोटो बनावट असून फोटोशॉप केला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
"अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या 'गजाल्या' सुरू झाल्यात. त्यासाठी 'असले' मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे आहे," असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
"आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर पोलीस असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावं," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती