मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय - सुप्रिया सुळे

शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (08:40 IST)
दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्र सरकारनं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मोदी सरकारचा निषेध करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागानं प्रदेश कार्यालयात संविधान गौरव दिन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
सुळे यांनी म्हटलं, "मोदी सरकार संविधान बदलू पाहत असून भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल. संविधान जात, धर्म किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण आता केंद्रातील सत्ताधारी हे संविधान बदलू पाहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती