आयकर विभागाची धाड, 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त

गुरूवार, 11 ऑगस्ट 2022 (15:38 IST)
जालन्यात गज उत्पादन कारखानदारांच्या घरावर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. या छापेमारीत आयकराने 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. यात 58 कोटींची रोख रक्कम, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरेसह 16 कोटींचा ऐवज आयकराने जप्त केला आहे. याशिवाय 300 कोटींची मालमत्तेसंबंधीत कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे.
   
जालन्यात 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरु होते, गेल्या 8 दिवसांपासून हे धाडसत्र सुरु होते. आयकराच्या अधिकाऱ्यांनी विविध पथकाच्या मदतीने एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी मारली. आयकर विभागाकडून जालन्यातील नवीन एमआयडीसी मधील 3 रोलिंग मिल आणि त्यासंबंधीत आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरु आहे. यात औरंगाबादच्या एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईत तब्बल 390 कोटींची रोकड जप्त केली. अधिकाऱ्यांनी ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 16 तास लागले.
 
विशेष म्हणजे जालन्यात आयकर विभागाचे अधिकारी कोणालाही खबर लागू नये यासाठी मॅरेज पार्टीचे स्टिकर्स लावलेल्या लग्नाच्या गाड्यातून शहरात पोहोचली. मात्र जालन्यातील चार बड्या स्टील कारखानदारांनी आर्थिक व्यवहारातून कोट्यावधी रुपयांचे अधिक उत्पन्न आणि व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आलेली नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती