शिवसेनेच्या नेत्याकडे आयकर विभागाच्या छापा पडल्यावर किरीट सोमय्या कडून नवी यादी जाहीर

शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (11:15 IST)
नवाब मलिक यांना अटक केल्यावर सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज मुंबई स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक तोंडावर आल्यावर ही कारवाई करणे राजकीय षडयंत्र असल्याचे शिवसेनेचे नेते म्हणत आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसरकारच्या काही नेत्यांची नवीन यादी जाहीर केल्यामुळे आता या वादात अधिक भर पडली आहे. या काही नेत्यांच्या विरोधात काही अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. 
 
सोमय्या यांनी 12 नेत्यांची नवी यादी जाहीर केली होती. या यादीला डर्टी डझन्स असे नाव दिले होते. त्यात अनिल परब, सूट पाटेकर, संजय राऊत, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, रवींद्र वायकर, अनिल देशमूख आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे. या मध्ये यशवंत जाधव यांचे नाव नव्हते.  

आता आयकर विभागाने स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्यावर किरीट सोमय्या यांनी आता नवीन यादी जाहीर केली आहे. 

या यादी मध्ये यशवंत जाधव, यांच्या पत्नी यामिनी जाधव आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा नावाचा समावेश आहे. 
 
यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते असून मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहे. तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती