नाशिकचे 2 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, सुरक्षित असल्याची माहिती कुटुंबियांना दिली

शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (10:02 IST)
सध्या रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आहे. भारतातील विध्यार्थी देखील तिथे शिक्षणासाठी गेले आहे. राज्यातील नाशिकचे दोन विद्यार्थी देखील युक्रेन ला वैद्यकीय शिक्षणासाठी गेले आहे. युद्धाच्या वातावरणात अडकलेल्या मुलांचा कुटुंबात सध्या काळजीचे आणि तणावाचे वातावरण आहे. दिवसभर कुटुंबातील सदस्यांचा नजरा टीव्ही कडे लागल्या आहेत. नाशिकची आदिती देशमुख आणि प्रतीक जोंधळे हे दोघे युक्रेन मध्ये 8 फेब्रुवारी ला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहे. हे दोघे आते-मामे बहीण भाऊ आहे.

आदिती देशमुख ही नाशिकच्या प्रतीक कॉलेज रोड च्या परिसरात राहते.  युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी त्यांनी खारकीव्ह विद्यापीठात येथे प्रवेश घेतला आहे. ते गेल्याच्या काही दिवसानंतर तिथे रशिया -युक्रेन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयात तणावाची स्थिती झाली आहे.

गुरुवारी या विद्यापीठापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर बॉम्ब टाकण्यात आले. या विद्यापीठातील सुमारे 3500 विद्यार्थ्यांना एका तळघरात सुरक्षितपणे हलवण्यात आले. गुरुवारी आदितीने आपल्या कुटुंबियांशी संवाद साधून आपण दोघे सुखरूप असल्याचे सांगितले. तसेच तळघरात जातानाचा व्हिडीओ देखील पाठवला. दोघांना सुखरूप पाहून कुटुंबीयांना समाधान वाटले. युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी तातडीने आणण्याचे प्रयत्न करावे. अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती