उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी छापे टाकत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या छापेमारीमध्ये तीन जिल्ह्यामधून २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आले आहे.सलग पाच दिवसात आयकर विभागाने केलेल्या कारवाईत कोट्यावधींच्या रोख रकमेसह मौल्यवान दागिने जप्त केले आहेत. यात एकूण 175 अधिकाऱ्यांनी तब्बल 32 ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी सापडलेला पैसा 12 तास मोजला आणि संपत्तीची एकूण मोजणी करायला तब्बल 5 दिवस लागले. यासाठी 22 गाड्यांमधून 175 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान या कारवाईमध्ये ६ कोटींच्या रकमेसह ५ कोटींचे दागिने देखील जप्त करण्यात आले आहे. यामध्ये जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार आणि बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. छाप्यामध्ये सोन्याचे बिस्किट्स, मौल्यवान हिरे सापडल्याची माहिती मिळत आहे. विशेषतः सोन्याच्या बिस्कटांचे प्रमाण मोठे आहे. छापेमारीमध्ये आढळलेली सर्व बेहिशोबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे. संशयित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.