नाशिक मध्ये कांदा व्यापाऱ्या कडे आयकर विभागाचा छापा, 25 कोटीची रोकड जप्त

रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (12:29 IST)
नाशिक मध्ये आयकर विभागाने एका कांदा व्यापाऱ्या कडे छापा टाकून मोठं घबाड सापडले आहे. कांदा व्यापाऱ्यांकडून 25 कोटी रुपये जब्त केले आहे. व्यापाऱ्याकडे 3 दिवसा पासून आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. एवढे रुपये मोजण्यासाठी अनेक तास लागले अशी माहिती मिळत आहे. आयकर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ही धाड टाकल्याचे सांगितले जात आहे. या मध्ये काही व्यापारी कांद्याचे तर काही द्राक्षाचे व्यापारी आहेत. आयकर विभागाच्या मते,व्यापाऱ्यांनी 100 कोटी रुपये आयकर चुकविल्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्यापाऱ्यांकडून 25 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नाशिक हे देशातील सर्वात मोठे कांदा बाजार आहे. नाशिक मधून कांदा देशभरात पुरवला जातो.  येथे कांदा व्यापारी मोठ्या संख्येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहे. आयकर विभागाच्या या कारवाई मुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. तपास अद्याप सुरु आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती