समीर वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिकांचं मंत्रिपद जातं हे पाहू : रामदास आठवले

रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (09:57 IST)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल विभागाचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची नोकरी घालवण्याचा इशारा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला होता. याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 
समीर वानखेडे यांची नोकरी जाते की नवाब मलिकांचं मंत्रिपद जातं, हे पाहूया, असं आव्हान आठवले यांनी दिलं आहे.
 
शनिवारी (23 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
 
राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांकडून राज्यात कारवाया होत असल्या तरी त्यातून शरद पवार यांच्या कुटुंबाला अथवा कुणालातरी त्रास देण्याचा उद्देश नाही, असं आठवले यांनी स्पष्ट केलं.
 
या यंत्रणा पूर्णत: स्वतंत्र असून, त्यांच्या कारवाईंमध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा संबंधच येत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
 
बातमीनुसार राजकीय नेत्यांनी तपास चालू असताना तपास यंत्रणा आणि त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर हा कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका आहे, असं मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती