राष्ट्रीय महिला आयोगाची राज्य सरकार वर टीका

रविवार, 12 सप्टेंबर 2021 (13:40 IST)
मुंबईच्या साकीनाकातील झालेल्या निर्घृण अमानवीय कृत्यामुळे बलात्कार झालेल्या त्या महिलेच्या मृत्यू नंतर राष्ट्रीय महिला आयोगाची टीम मुंबईत दाखल झाली.राष्ट्रीय महिला आयोगानं राज्य सरकारवर टीका केली आहे.राज्य सरकार ही आघाडीच्या राजकारणाची शिकार झालेली असावी म्हणून राज्यात महिला आयोगाचे स्थापन्न झालेले नाही.असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य यांनी म्हटले आहे.
 
त्या म्हणाल्या की राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग असायलाच पाहिजे.राज्य महिला आयोग ही महत्त्वाची संस्था आहे.जी राज्यातील पीडितांना मदत करते.इतर सर्व राज्याच्या  महिला आयोगाशी आम्ही नियमित संपर्कात असतो.कोरोना साथीच्या रोगात आम्ही इतर राज्यातील गरजू महिलांना मदत करू शकलो.त्या राज्यातील महिला आयोगाशी संपर्क साधू शकलो.पण महाराष्ट्रात अद्याप महिला आयोगच नसल्यामुळे आम्ही संपर्क कोणाशी करावा.
 
साकीनाकामध्ये जी काही घटना घडली आहे ती अतिशय लज्जास्पद आणि हादरवून टाकणारी आहे.पोलिसांनी दिलेले विधान की आम्ही सर्वत्र लक्ष देऊ शकत नाही अत्यंत लाजिरवाणी आणि चुकीचे आहे.पोलीस जनतेचे रक्षण करण्यासाठीच आहे.पोलिसांचा धाक असा असावा की त्या क्षेत्रात कोणतीही घटना घडू नये. पोलिसांनी देखील अशा गुन्हेगारांवर आपले धाक आणि दहशत दाखवावी जेणे करून गुन्हेगारीवर आळा बसेल .लवकरात लवकर राज्यात महिला आयोगाची स्थापना करावी.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती