कोयना धरण आज उघडणार

रविवार, 12 सप्टेंबर 2021 (10:32 IST)
सध्या पावसाचा जोर सर्वत्र सुरु आहे,काही ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद आहे .महाराष्ट्राच्या पाटण तालुक्यातील कोयना धरणात पाण्याची पातळी वाढली आहे.त्यामुळे धरणातून आज दुपारी धरणाचे दार उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोयना नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
कोयना धरण्यात गेल्या महिन्यात पावसाचा जोर जास्त झाल्यामुळे पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दार आज पुन्हा उघडणार.सध्या कोरोनाधारणात पाण्याची पातळी 2161 फूट  11 इंच झाली आहे. धरणात 103.19 टीएमसी पाण्याचा साठा झाला आहे.या यापूर्वी जुलै महिन्यात देखील कोयना धरण उघडण्यात आले होते.आज पुन्हा दुसऱ्यांदा देखील पाण्याचा साठा जास्त झाल्यामुळे धरणाचे दार उघडणार आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती