तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा न्यायालयाचा निर्णय हा अत्यंत धाडसी निर्णय होता, असं सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी म्हटलं आहे.अलाहाबाद हायकोर्टानं 1975 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर देशात 2 वर्षांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली होती, असं रमण्णा म्हणाले.
निवडणुकीतील गैरप्रकारांप्रकरणी इंदिरा गांधींना दोषी ठरवत त्यांना न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं. तसंच त्यांना सहा वर्ष कोणतंही पद स्वीकारण्यासही अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्याचा परिणाम म्हणजे दोन वर्षांची आणीबाणी लावण्यात आली, असंही रमण्णा यांनी सांगितलं.