अचानक आलेल्या अवकाळी पावसाने डोंगरावरील तसेच परिसरातील शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रभाकर खुळे यांच्या शेतात घुसले. त्यांच्या एक हेक्टर शेतीच्या क्षेत्रात कांदा पिक लावण्यात आले होते. जमा झालेल्या पाण्याने दीड महिन्यांचे कांद्याचे पीक अक्षरश: मुळासकट पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पीक वाहून गेल्याने सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रभाकर खुळे पाटील यांनी केली आहे.