या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोएल जॉन्सन (२६, रा. ऋतु रिजन्सी, एनराईज बाय सयाजी हॉटेलच्या पाठीमागे, इंदिरानगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित समुपदेशकाचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, कोरोना काळात मानसिक स्थैर्याच्या समस्येतून विवाहितेने सोशल मिडीयामार्फत संशयित काउन्सिलरशी संपर्क साधला होता.
संशयिताशी कौन्सिंलिंगच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर संशयिताने प्रेमाचे नाटक करीत पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर गुजरात, केरळ व हैदराबाद येथील वेगवेगळ्या हॉटेल्सवर नेत बलात्कार केला तसेच मारहाणही केली.
तसेच, संशयिताने पीडितेला मारहाणही केली. हा प्रकार जानेवारी २०२१ ते जुलै २०२३ यादरम्यान घडला आहे. दरम्यान विवाहितेने पोलीसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.