राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि छगन भुजबळ राज्य सरकार मध्ये शामिल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षात मोठा वाद निर्माण झाले आहे. दोन्ही गटात याचा परिणाम दिसून आला असून आज सकाळी अजित पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयाचा ताबा घेतला. आज या भवनात शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार असून शरद पवार यांच्या गटातील काही नेते जमले होते.या कार्यालयात भुजबळ गटाचे कार्यकर्त्ये जमले होते. अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांना कार्यालयाचा बाहेर काढले.त्यामुळे दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. या मुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.