Nanded : शाळेचे छत कोसळून विद्यार्थी जखमी जिल्हा परिषद शाळेची घटना

शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (18:57 IST)
नांदेडच्या जिल्हा परिषदेत शाळा सुरु असताना गेल्यावर्षीच्या बांधकाम झालेल्या शाळेचे छत कोसळल्याची घटना रावणगाव येथे घडली आहे. या घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला आहे. सुदैवाने मोठा अपघात टळला.
 
राज्यात सध्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय आहे. शाळेतील पडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरवतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. या शाळेंमध्ये अपघात होण्याची शक्यता आहे. हा विषय गंभीर असून या कडे कोणाचेही लक्ष नाही.

पण गेल्यावर्षी नव्याने बांधकाम झालेल्या नांदेडच्या हदगावच्या जिल्हा परिषदेत दररोज प्रमाणे शाळा भरली गेली होती. विद्यार्थी दररोज प्रमाणे अभ्यास करत असताना इमारतीचे छत विद्यार्थ्यांवर कोसळले. या मध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून वैभव जाधव असे त्याचे नाव आहे. सुदैवाने मोठा अपघात टळला.

या घटनेची माहिती मिळतातच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेतली. गेल्या वर्षीच या शाळेच्या इमारतीचे काम करण्यात आले असून इमारतीचे बांधकाम बोगस केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 

ही घटना घडल्यापासून शिक्षण विभागाच्या एका ही अधिकाऱ्यांनी या शाळेला भेट न दिल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती