Pune : झुरळांमुळे पनवेल -नांदेड एक्स्प्रेस थांबली

रविवार, 6 ऑगस्ट 2023 (11:28 IST)
रेल्वे मध्ये उंदीर आणि झुरळ असणं हे सहज आहे. स्लीपर कोच मध्ये हे आढळतात.पण एसी कोच मध्ये झुरळांच्या त्रासामुळे प्रवासी हैराण झाले असून झुरळांमुळे चक्क रेल्वे थांबवण्याची घटना पुणे स्थानकावर घडली आहे. झुरळांमुळे पनवेल- नांदेड एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी थांबवून ठेवली. रेल्वे प्रशासनाला पेस्ट कंट्रोल केल्यांनतर ही गाडी सोडण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,पनवेलवरून नांदेड कडे जाणारी  पनवेल- नांदेड रेल्वे क्रमांक 17613 4 वाजता  निघाली .मात्र या रेल्वेच्या B1 एसी कोच मध्ये झुरळ चक्क प्रवाशांच्या अंगावर पडत होते. या कोच मध्ये लहान मुले, वृद्ध आबाळ, महिला प्रवास करत असताना त्यांच्या अंगावर झुरळ पडत असल्याने प्रवाशी हैराण झाले आहे.

रेल्वेचे एवढे महागडे तिकीट घेऊन देखील रेल्वेकडून प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे लोकांचा संताप झाला आहे. ही ट्रेन झुरळांनी भरलेली आहे. रेल्वे प्रशासनला तक्रार करून देखील कोणतीही दखल घेतली नाही. प्रवाशांनी शेवटी मागणी करून रेल्वे पुणे स्थानकावर थांबविली ट्रेन मध्ये प्रवास करणारे प्रवासी कैलास मंडळापुरे यांनी सांगितले की या ट्रेन मध्ये फक्त झुरळ आहे. लोकांच्या अंगावर, सामानावर हे झुरळ पडत आहे.   
नंतर रेल्वे प्रशासनाने पेस्ट कंट्रोल करून तब्बल दोन तासांनी रेल्वे नांदेड कडे सोडण्यात आली. 
 
Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती