नांदेड-बिदर महामार्गावरील खड्डा बनला जीवघेणा

गुरूवार, 6 जुलै 2023 (08:13 IST)
उदगीर : उदगीर शहरातून जाण-या राष्ट्रीय महामार्ग नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर बिदर गेटच्या उड्डाणपूलावर मोठा खड्डा नव्हे तर मोठे भगदाड पडले आहे. येथे रात्री अपरात्री अपघात होण्याची शक्यता असून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी जयवंतराव पाटील मित्र मंडळाचे कार्यकर्ते माणिकराव शिंदे, रामंिलग झुंगा, बबन कांबळे यांनी केले आहे.
 
उदगीर शहरासह ग्रामीण भागातही अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उड्डाणपूलच्या रस्त्याची दुरवस्था अपघातास कारणीभूत ठरत आहे. अपघात होण्यास अतिवेग हे जरी प्रमुख कारण असले तरी उड्डाणपूलावरील ओव्हरटेक करणे, चुकीच्या दिशेने प्रवास करणे ,उड्डाणपूलावर दिशादर्शक फलक नसणे, निष्कृष्ट दर्जाचे रस्ते, उड्डाणपूलावर जागोजागी पडलेले खड्डे, हे अपघाताची कारणे आहेत. उड्डाणपूलावर दिशादर्शक फलक नसल्याने मंगळवारी रात्री अपघात घडला. या ठिकाणी वारंवार अपघात घडले असले तरी रस्ता कंपनीकडून सुधारणा केली जात नसल्याने वाहनधारक संताप व्यक्त करीत आहेत. नांंदेड बिदर राष्ट्रीय महामार्गावर पडलेला खड्डा तातडीने बुजविण्यात यावा, अशी मागणी जयवंतराव पाटील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती