बाजार तळात गज व दगडाने मारहाण करत तरूणाचा खून

सोमवार, 3 जानेवारी 2022 (20:55 IST)
सात ते आठ जणांनी रॉड, गज व दगडाने मारहाण करत तरूणाचा खून केला.
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजार तळात आज दुपारी ही घटना घडली.राजा भोसले असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमी भोसले याला शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेमुळे बाजारपेठेत तणावपूर्ण शांतता आहे.तरूणाचा भरबाजारात खून झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती