अमेरिकेत शटडाऊन होऊन दहा दिवस उलटले आहेत. आता ट्रम्प प्रशासनाने संघीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. ट्रम्प प्रशासनाकडून डेमोक्रॅटिक पक्षावर दबाव आणण्याची ही एक रणनीती म्हणून पाहिले जात आहे, परंतु यामुळे अमेरिकेतील राजकीय संकट आणखी वाढेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. यूएस ऑफिस ऑफ बजेट अँड मॅनेजमेंटचे संचालक रस वॉट यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कर्मचाऱ्यांची कामावरून काढून टाकणे सुरू झाले आहे. बजेट अँड मॅनेजमेंट विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मोठ्या प्रमाणात कामावरून काढून टाकले जाऊ शकते.
ट्रम्प प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या निर्णयावरही टीका सुरू झाली आहे. डेमोक्रॅटिक खासदारांसोबतच सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या अनेक खासदारांनीही ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.अमेरिकेत 1 ऑक्टोबरपासून शटडाऊन सुरू झाला. ट्रम्प प्रशासनाने सर्व संघीय संस्थांना अशा कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी बजेट ऑफिसला देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांना नोकरीवरून काढून टाकता येईल.