Munde brother-sister relationship राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरू असताना धनंजय मुंडे यांचं एक व्हिडीओ समोर आला आहे. नुकतंच धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ दिली आणि शिंदे फडणवीस सरकारसोबत महायुती करत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता सोशल मीडियावर धनंजय मुंडे याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
नेहमी राजकीय मैदानात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे शाब्दीक लढा आणि वैचारीक लढा जरी पाहायला मिळत असला तरी आता धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांनी औक्षण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.