किश्तवाड दहशतवादी चकमकीत शहीद झालेल्या सैनिकाची ओळख पटली असून तो संदीप पांडुरंग, करनाडी तहसील अकोला, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र येथील रहिवासी आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, सुरक्षा यंत्रणांना चतरूच्या सिंगपोरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. स्वतःला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.