नांदेडमध्ये एकादशीला फराळ केल्यानंतर 50 भाविक पडले आजारी, रुग्णालयात दाखल
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना माहूरमध्ये घडली. अन्नातून विषबाधा झाल्याने लोक आजारी पडल्याचे बोलले जात आहे. ठाकूर बुवा यात्रेसाठी माहूर येथे आलेल्या सुमारे 50 भाविकांना शनिवारी रात्री एकादशीला भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानंतर रविवारी सकाळी उलट्या होऊ लागल्या," असे अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर त्यांना माहूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. चौघांची प्रकृती गंभीर होती. तथापि, डॉक्टरांनी आता सांगितले आहे की सर्व रुग्ण ठीक आहे आणि त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व भाविक २५ जानेवारी रोजी षट्ठीला एकादशीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील ठाकूर बुवांच्या दर्शनासाठी आले होते. एकादशीच्या व्रतामुळे भाविकांनी भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली. यामुळे त्यांना अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे.