मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना, कुत्र्याने चावा घेतला आहे. अग्निशमन दलाचे जवान बस स्टॉपजवळ पडलेले एक झाड काढत होते. त्यानंतर त्यांच्यावर एका कुत्र्याने जोरदार हल्ला केला. कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी या घटनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ठाण्यातील गमदेवी परिसरात अग्निशमन दलाचे कर्मचारी बस स्टॉपजवळ पडलेले झाड तोडून ते काढण्याचा प्रयत्न करत होते. पण, नंतर एका कुत्र्याने दोन कर्मचाऱ्यांना चावा घेतला.