पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी? जळगाव दुर्घटनेवर खरगे यांनी केली मागणी

गुरूवार, 23 जानेवारी 2025 (09:37 IST)
Jalgaon train accident news: पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवांमुळे झालेल्या रेल्वे अपघातात अनेक जणांच्या मृत्यूबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी शोक व्यक्त केला. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, असे ते म्हणाले.   
ALSO READ: अमित शहांनी फडणवीसांशी केली चर्चा, जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा
मिळालेल्या माहितनुसार बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात एका ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर काही प्रवासी रुळांवर उतरले आणि त्यांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने धडक दिल्याने झालेल्या घटनेत किमान 12 जणांचा मृत्यू झाला. तसेच मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'एक्स' वर पोस्ट केले की, "महाराष्ट्रातील जळगाव येथे पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे अनेकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. अनेक लोक जखमीही झाले आहे. पीडितांच्या शोकाकुल कुटुंबांप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना आणि मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आम्ही प्रार्थना करतो. "जखमींच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी आमची इच्छा आहे." ते म्हणाले, "सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी पीडितांना त्वरित आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि अफवा पसरवणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी." या दुःखाच्या वेळी पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती