'मोदी-शहा फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत'- नाना पटोले

रविवार, 4 एप्रिल 2021 (11:43 IST)
केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला किती पॅकेज दिले यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
"सरकारला लक्ष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी पाश्चिमात्य देशातील आकडेवारी दिली. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण काळात किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवं. 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी महाराष्ट्राला किती मिळाले? दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत. म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सुचवत आहेत," अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
"महाराष्ट्र संकटात असताना भाजप नेते कटकास्थानं करत राहिले. केंद्रीत तपास यंत्रणांच्या आडून भाजप नेत्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केलं. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदत निधीसाठी पैसे न देता भाजप नेत्यांनी पीएम केअर फंडात पैसे जमा केले," असंही पटोले म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती