एनआयए कोर्टाने मुंबई पोलिसांचे माजी अधिकारी सचिन वाझेच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता की त्यांना छातीत दुखणे आणि हृदयविकाराचा त्रास आहे. यानंतर एनआयए कोर्टाने वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागविला आहे. सचिन वाझे हे अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.त्यांना एनआयएने 13 मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत आज संपणार आहे.