राज्यातील जिम,मल्टिप्लेक्स बंद करू शकते उद्धव सरकार

रविवार, 4 एप्रिल 2021 (11:09 IST)
शुक्रवारी देशात 89,019 रुग्ण आढळले. उर्वरित राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट आहे.
शनिवारी महाराष्ट्रात कोविडचे 49,447 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे आतापर्यंतच्या एकाच दिवसात सर्वाधिक नोंद झाले आहेत. यामुळे, राज्यात संक्रमित होण्याची एकूण संख्या 29,53,523 पर्यंत वाढली आहे, तर संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या 277 रूग्णांच्या मृत्यूसह मृतांची संख्या 55,656 वर पोचली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या घटनांचा विचार करता, उद्धव सरकार लवकरच जिम, मॉल आणि मल्टिप्लेक्स बंद करण्याची घोषणा करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईत कोरोनाची 9 हजाराहून अधिक प्रकरणे
मुंबई शहरात कोविड चे 9,108 प्रकरणे समोर आले आहेत. जे एका दिवसात सर्वाधिक आहेत. या पूर्वी यापूर्वी, 17 सप्टेंबर 2020 रोजी एकाच दिवसात सर्वाधिक 24,619 नवीन रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली. आरोग्य विभागाने म्हटले आहे की 1,84,404 अधिक तपासांची भर घालून महाराष्ट्रात आतापर्यंत केलेल्या एकूण तपासणीची संख्या वाढून 2,03,43,123 झाली आहे. विभाग म्हणाले की, राज्यात रिकव्हरीचे प्रमाण आता 84.59 टक्के आहेत.तर मृत्यूचे प्रमाण 1.88 टक्के आहे.विभागाने म्हटले आहे की  277 मृत्यूंपैकी 132 मृत्यू गेल्या 48 तासांत झाल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती