दिवाळीच्या मुहूर्तावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्रच पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी एसटी कामगाराच्या व्यथा मांडल्या आहेत. तसचं याच पत्रातून राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे.
'एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी- कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.' अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्य सरकारला एक प्रकारचा धोक्याचा इशाराच दिला आहे.
'आज गरज आहे ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. 'एसटी कर्मचारी- कामगार जगला, तरच एसटी जगेल' हे भान बाळगण्याची.'
'माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी-कामगारांमथधील असंतोषाचा उद्रेक होईल.'