आमदार धनंजय मुंडे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आणले जाणार

Webdunia
बुधवार, 4 जानेवारी 2023 (17:43 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातामध्ये धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली असल्याचंही समोर आलं आहे. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परळीमध्ये अपघात झाल्याची माहिती धनंजय मुंडेंच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली असून स्वत: धनंजय मुंडेंनी हे ट्वीट रीट्वीट केलं आहे.
<

काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे

— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023 >
नेमकं घडलं काय?
धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परत येताना हा अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला असून धनंजय मुंडेंना किरकोळ दुखापत झाली आहे.

धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील उपचारासाठी मुंडे यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात आणले जाणार आहे. यासाठी लातूरहून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंडे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पुढील लेख