मिलिंद देवरांचा काँग्रेसला रामराम, ‘काँग्रेससोबतचं 55 वर्षांचं नातं संपवतोय’

रविवार, 14 जानेवारी 2024 (10:26 IST)
facebook
मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपण काँग्रेस पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं आहे
मिलिंद देवरा यांचा शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडून 2014 आणि 2019 च्या सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून पराभव झाला होता.
 
त्यामुळे यंदा मुंबई दक्षिण हा लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला दिली जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. म्हणून देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याच्या अटकली लावल्या जात आहे.
 
“आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वपूर्ण अध्यायाचा समारोप होतोय. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे," असं देवरा यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीलं आहे.
रविवारी (14 जानवारी) काँग्रेस सोडल्याची घोषणा केल्यानंतर देवरांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे.
 
याआधी देवरा यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपच्यावेळी मुंबई दक्षिणची जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सेनेकडे जाण्याच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त केली होती.
 
काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्याशी संवाद साधताना देवरा यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. जागावाटपाच्या चर्चेत अंतिम निर्णय झाल्याशिवाय मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघावर सेनेने दावा करू नये असं देवरांनी सांगितलं होतं. त्यांचे दिवंगत वडील मुरली देवरा यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा केली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
पण अरविंद सावंत यांनी मुंबई दक्षिणमध्ये येत्या लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने देवरांची नाराजी अधिक वाढली असल्यांचं सांगण्यात येत आहे.
 
काही महिन्यांपूर्वी, देवरा आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर ते अजित पवार गटात सामील होण्याची अफवा पसरली होती . पण देवरा यांनी ती शक्यता फेटाळली होती.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती