कोल्हापुरात गाडी चालवताना आला हृदयविकाराचा झटका, मृत्यू

रविवार, 16 मार्च 2025 (14:25 IST)
कोल्हापुरात गाडी चालवताना एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि गाडी नियंत्रणाच्या बाहेर गेली आणि गाडीचा अपघात झाला. या अपघातात धीरज शिवाजीराव पाटील यांचा मृत्यू झाला. 
ALSO READ: चंद्रपूरमध्ये पिकनिकसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5भावांचा मृत्यू
बीएसएनएल टॉवरपासून टाकळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपुलाजवळ हा भीषण अपघात झाला. धीरज यांना गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आला आणि गाडी नियंत्रणाच्या बाहेर गेली. आणि अनेक वाहनांना धडकली. या अपघातात धीरज यांचा मृत्यू झाला. 
ALSO READ: बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या, सोशल मीडियावर मुलीची माफी मागितली
 अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, धीरज पाटील यांना गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. धडक एवढी जोरदार होती की, अनेक वाहनांचे नुकसान झाले. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या मध्ये एक वेगाने येणारी कार अनेक वाहनांना धडकते. या अपघातात अनेक लोक थोडक्यात बचावले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले. धीरज यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने आल्याचे अहवालात सांगितले आहे.  
Edited By ya Dixit 
 
 ALSO READ: औरंगजेबाची कबर हटवण्यावरून वाद झाला, उद्यापासून विहिंप-बजरंग दलाचे आंदोलन

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती