Maharashtra Budget 2020: स्थानिकांना रोजगार देण्यासाठी मोठी घोषणा
शुक्रवार, 6 मार्च 2020 (13:06 IST)
महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर आज सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सदनात आज अर्थसंकल्प सादर केला. जाणून घ्या महत्तवाचे बिंदू-
मुद्रांक शुल्कात सवलत
घर स्वस्त होतील... सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत जाहीर केली. याने मालमत्ता क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
२ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आम्ही अटी नियमांशिवाय उभं करण्याचा प्रयत्न... कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न... शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
स्थानिकांना रोजगार देण्यासाठीही मोठी घोषणा
स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह
नोकरदार मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त तृतीयपंथांसाठी मंडळ स्थापन करण्यात येणारआहे. यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
महिला सुरक्षा हे सरकारचं प्राधान्य
महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
रोज १ लाख शिवभोजन थाळी देणार
रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर ५०० थाळी देणार. शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठी माध्यमांच्या शाळांसाठी विशेष तरतूद
जिल्हा परिषदांच्या शाळांचाही दर्जा वाढवणार... सर्व शाळांना इंटरनेटनं जोडण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करणार.