त्र्यंबकेश्वर मंदिरात नितेश राणेंकडून महाआरती

मंगळवार, 23 मे 2023 (21:12 IST)
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर वाद प्रकरणी आमदार नितेश राणे  यांनी त्र्यंबकेश्वर येथे येऊन मंदिरात महाआरती केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
 
यावेळी राणे म्हणाले की, या भागातील शांतता भंग करणे हा आमचा हेतू नाही. पण सातत्याने १३ मे रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात जे गैरसमज पसरवले जात आहे, हिंदूंची बदनामी केली जात आहे. त्या सगळ्याबाबतीत गावकऱ्यांच्या इच्छेनुसार, ट्रस्टनुसार आज आम्ही भेट देण्यासाठी येथे आलो. उरूस निघाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे धूप दाखवण्याची परंपरा आहे, असे सातत्याने बोलले जाते. परंतु, हे साफ खोटे आहे. आम्ही यासंदर्भात ग्रामस्थांशी बोललो, विश्वस्तांना बोललो. अशा कोणत्याही पद्धतीची परंपरा नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे", नितेश राणेंनी म्हटले.
 
तसेच राणे पुढे म्हणाले की, उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. ते लोक काय करतात? की धूप दाखवतात हा त्यांचा प्रश्न आहे. जिहादी विचारांचे युवक या मंदिरात आले. त्यांनी फेसबूक लाईव्ह केले. मंदिर बंद असताना मंदिर मध्ये शिरण्याचा हट्ट करण्यात आला. तुम्हाला पूजा-अर्चा करायची आहे तर सगळे जसे येतात तसे आतमध्ये या. आरतीचे सामान घ्या, पूजेचे सामान घ्या. रांगेत उभे राहा, आतमध्ये या. सगळे जसे दर्शन घेतात, हिंदू धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा. याला कोणालाही आक्षेप नाही", असेही नितेश राणे यांनी म्हटले.
 
महाविकास आघाडीपासून  आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची घाई आहे. मात्र सद्यस्थितीला शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का? असा सवाल  राणे यांनी उपस्थित केला . 
 
 
यावेळी नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत  टेबल पत्रकार असून त्यांना नवीन संसद भवनाबाबत किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे असे सांगितले. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती