मला मतदान करत नाहीत तर माझ्याकडे कशाला आला, शेतकऱ्यांना सवाल राज ठाकरे यांनी केला

सोमवार, 22 मे 2023 (08:42 IST)
अडचणीच्या काळात माझ्याकडे येता आणि मतदान त्यांना करता. नाशिकमध्ये भेटायला आलेल्या शेतकऱ्यांना असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी सांगितल्या. यावरून ठाकरे यांनी त्यांना झापलं.शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी जे वक्तव्य केलं ते चांगलंच चर्चेत आलं आहे.
 
यावेळी बोलताना राज ठाकरेंना शेतकरी म्हणाले, साहेब अडचण वेगळी आणि मतदान वेगळं. यावर राज ठाकरे म्हणाले की, जे तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करत नाहीत,तुमची पिळवणूक करणाऱ्यांना तुम्ही मतदान करता तर तुम्ही माझ्याकडे का येता असा सवाल त्यांना केला.
 
निवडणुकीच्या काळात पैसे घेऊन मतदान करता. पुन्हा पाच वर्षे त्याच्या नावाने टाहो फोडता. आणि पुन्हा निवडणुका आल्या की पुन्हा त्यांना मतदान करता. त्यामुळे आपण काय करतो आहोत त्याचं भान ठेवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसंच शेतकरी प्रतिनिधींसह आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती