नेत्यांच्या घरी आंदोलन करणे किंवा राजकीय पक्षाच्या समोर आंदोलन करणं हे योग्य नाही : नवाब मलिक

सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (22:02 IST)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिक म्हणाले की, आज जे काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीसांच्या घरावर आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. ती भूमिका योग्य नाही. कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घरी आंदोलन करणे किंवा राजकीय पक्षाच्या समोर आंदोलन करणं हे योग्य नाही असे सूचक विधान नवाब मलिकांनी केलं आहे.
 
दरम्यान नवाब मलिक पुढे म्हणाले की, हे नवीन पायंडा आहे. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी करण्याची परिस्थिती निर्माण करणे. आपण लोकशाहीमध्ये विरोध करणे आपल्या आधिकारात असताना जे सरकारने प्रशासनाने न्यायालयाने निश्चित करुन दिलेली जागा आहे. परवानगी घेऊन प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचे अधिकार आहेत. तो काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना असेल राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन पुकारतील हे जे नवीन सुरुवात झाली आहे. ती योग्य नाही. यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्याने असे काही करु नये अशी आमची पक्षाची भूमिका आहे. यामुळे प्रशासनावर ताण पडतो, पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण होतो यामुळे पुढे प्रत्येक पक्षाने बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे आणि या प्रकारचे आंदोलन नको हे असे आपले स्पष्ट मत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती